दा. ध. कोसंबी - लेख सूची

कोसंबी विचार-सार

काही लोकांसाठी प्रश्न सोडवत राहाणे श्वासोच्छ्रास करण्याइतके आवश्यक असते. याची कारणे मानसशास्त्राच्या क्षेत्रात येतात. पण वैज्ञानिक प्रश्नच का सोडवावे ? देवशास्त्र, साहित्य, कला, या क्षेत्रांमध्ये अभिव्यक्तीचे मार्ग का शोधू नयेत? अनेक कार्यरत वैज्ञानिक या प्रश्नांवर जाणीवपूर्वक विचार करत नाहीत. ज्या देशांमध्ये केवळ धर्मशास्त्र, देवशास्त्र, यांवरच विचारवंतांनी लक्ष केंद्रित केले, ते देश अडाणी आणि मागासलेले राहिले. …

भगवद्गीतेची सामाजिक आणि आर्थिक अंगे

‘भगवद्गीता’ हा महाभारत या भारतीय महाकाव्याचा एक भाग आहे. गीतेच्या १८ अध्यायात पांडववीर अर्जुन आणि त्याचा यदु (कुलोत्पन्न) सारथी श्रीकृष्ण म्हणजे विष्णूचा आठवा अवतार, यांच्यात झालेल्या संवादाचा संजयाने सांगितलेला वृत्तान्त आहे. प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्यापूर्वी अर्जुनाला युद्धात होणाऱ्या आपले भाऊ आणि कुलबंधू यांच्या संहारात त्याला जो महत्त्वाचा वाटा उचलावा लागणार होता त्याच्या विचाराने त्याबद्दल घृणा …

. . . जर परवडत असला तर . . .

ज्या ऐतिहासिक प्रक्रियेने भारताला तरल, नाजुक, नखरेल दर्शने, धर्मशास्त्र, वास्तुकला आणि संगीत दिले; त्याच प्रक्रियेने उपाशी, मरगळलेली खेडी, संधीसाधू आणि हावरट ‘सुसंस्कृत’ (नागर) वर्ग, नाराज कामगार, ढासळती मूल्ये, अंधश्रद्धा यांनाही जन्म दिला. एक अंग दुसऱ्या अंगाचा परिणाम आहे. एक अंग दुसऱ्याची अभिव्यक्ती आहे. अगदी अनघड, प्राथमिक हत्यारांमुळे अतिरिक्त उत्पादन तुटपुंजे राहिले, आणि तेही (तंत्रज्ञानाला) समरूप …